पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
तरी ग्रामीण व शहरी भागातील नव तरूण, अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व इतर गरजूवंत लाभार्थ्यांनी दुधाळ- गाय गट, शेळी- मेंढी गट व कुक्कुटपालन व्यवसाय करिता अर्ज करावयाचा आहे. यामधून चांगला रोजगार मिळू शकेल तसेच सदर योजनेसाठी शासकीय अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. तरी सदर योजनेसाठी आपण विहित मुदतीत अर्ज करून घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.
पशुसंवर्धन योजनेमार्फत कोणत्या योजनेसाठी अर्ज करता येईल?
- राज्यस्तरीय योजना : दुधाळ- गाय म्हशी वाटप करणे.
- राज्यस्तरीय योजना : शेळी- मेंढी वाटप करणे.
- राज्यस्तरीय योजना : १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी किती आहे?
- अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.९.११.२०२३ ते ८.१२.२०२३ पर्यंत राहील.
- सन २०२१-२२ आणि २२-२३ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना दि.९.११.२०२३ पासून कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.
कागदपत्रे अपलोड करण्याची सूचना कशी मिळेल?
- योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी “CP-JAIENP” या नावाने SMS प्राप्त होतील. SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.
नावीन्यपूर्ण योजनेचा अर्ज कुठे व कसा करावा?
- सन २०२३-२४ या वर्षी अर्ज करण्याऱ्या नविन लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येईल.
- योजनेंतर्गत अर्ज करण्याची www.ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे.
नावीन्यपूर्ण योजनेचा अर्ज करतांना घ्यावयाची काळजी
- अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही.
कोणत्या रहिवाश्यांना योजनेचा लाभ मिळेल?
- महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५ – २६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
- सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी.
- त्यानंतर सन २०२२ – २३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.
- सन २०२२ – २३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना परत अर्ज करण्याची गरज आहे का?
सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. योजनानिहाय प्रतीक्षाधीन यादी (Waiting list) मध्ये आपले नाव पहा.
अर्जदार नोंदणी करण्यापुर्वी खालील महत्वाचा बाबी लक्षात घ्याव्यात
- * असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे.
- एका आधारकार्ड नंबर सोबत एकच मोबाइल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी.
- अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वत:चा / वापरात असणारा मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाइल नंबर वर अर्जाची सद्यस्थिति एसएमएस द्वारे कळवण्यात येईल.
- मोबाइल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्जदार अनुसूचीत जाती/जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का? या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे.
- राशनकार्ड नुसार नमूद सदस्यांची नावे, संख्या तसेच आधारकार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी.
- कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.
- माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल.
- अर्जदाराचा फोटो (फोटो क्षमता ८० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे फोटो निवडावे.)
- अर्जदाराची स्वाक्षरी (स्वाक्षरी क्षमता ४० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे फोटो निवडावे.)
अर्ज करण्यास कोणते कागदपत्रे लागतील?
- अर्जदाराचे आधार कार्ड/पॅनकार्ड
- कुटुंबाचा रेशनकार्ड
- जातीचा दाखला
- बँक पासबुक
- सात बारा व ८-अ
- जमीन नसल्याचा भाडे करार रू. १०० च्या स्टॅम्प पेपरवर
- अपत्य असल्याबाबत घोषणापत्र
- रहिवासी/ राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
- इतर अर्जासंबंधी अनुषंगीक माहिती
Online अर्ज करण्यासाठी संपर्क :
Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Gat No.2, Latur-413512 https://www.pdslatur.in/
Kishor Sasane Mob. No. 9689644390.
अर्ज करण्याची वेबसाईट :https://ah.mahabms.com
Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do so Your writing taste has been amazed me Thanks quite nice post
Mygreat learning This is my first time pay a quick visit at here and i am really happy to read everthing at one place
Tech Write For Us explores the transformative impact of AI in education. We provide in-depth articles on how AI enhances learning, supports educators, and personalizes student experiences. Stay informed with the latest trends and innovations in educational technology with us.