Sunday, January 26, 2025

Top 5 This Week

Related Posts

हरभरा उत्‍पादन तंत्रज्ञान

हरभरा हे महाराष्‍ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पिकाच्‍या उत्‍पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या बाबींचा विचार केला तर हरभरा लागवडीस व उत्पादनास तसेच महाराष्‍ट्रात मोठा वाव आहे. 

अलीकडे पर्यावरणातील वाढता असमतोलपणा, अपुरे पाऊस त्यामुळे निर्माण होणारी दुष्‍काळी परिस्थिती, कीड व रोगांचा वाढता प्रभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशा बाबींमुळे भारतातील प्रति हेक्‍टरी हरभरा पिकाची उत्‍पादकता मात्र कमी आहे. यासाठी कृषि विद्यापीठाने विकसित सुधारित व संकरित वाणांचा अधिकाधिक लागवडीसाठी वापर करणे तसेच शास्‍त्रोक्‍त पद्धतीने शेती व्‍यवसाय करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतीतून निरनिराळ्या पिकाचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन घेऊन स्वत:चे आर्थिक सशक्तीकरण करून देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकणे हे प्रथम कर्तव्य आहे. असे समजून पीक उत्पादन घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

महत्‍त्‍व व उपयाेग  

भारतातील बहुतांशी लोकसंख्या शाकाहारी असून आपल्या शरीराची प्रथिनांची गरज भागविण्यासाठी प्रामुख्याने हरभरा व कडधान्य पिकांवर अवलंबून रहावे लागते. पिकाचा उपयोग मनुष्याच्या आहारात कडधान्य पीक म्हणून तसेच गुरांना खाद्य म्हणून प्रामुख्याने केला जातो. भारतात उत्पादन होणाऱ्या कडधान्यांपैकी 37 टक्के क्षेत्र व 50 टक्के उत्पादन हे हरभरा या पिकाखाली आहे. हरभरा हे प्रथिने तसेच ऊर्जेचे स्‍त्रोत असून त्यात कॅल्शियम, लोह आणि अमिनो आम्लाचे  प्रमाण जास्त असते. हरभरा या पिकात 21.1 टक्के प्रथिने, 61.5 टक्के कर्बोदक, 4.5 टक्के मेदाचे प्रमाण असते. हरभऱ्याचा उपयोग अक्खे भाजून तसेच उकडून, मीठ लावून खाण्यासाठी करतात. या पिकाची डाळ करून किंवा पीठ (बेसन) मिठाईचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. पिकाची ताजे पाने भाजी (साग) करण्यासाठी वापरतात. हरभरा पिकामध्ये औषधी गुणधर्म आहेत. याचा उपयोग रक्त शुद्धीकरणासाठी केला जातो. पिकाचे मोड आलेले दाणे स्कर्व्ही या आजाराच्या नियंत्रणासाठी वापरतात.

हरभरा उत्‍पादन स्थिती

हरभरा हे प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. भारत, पाकिस्तान, मेक्सिको, तुर्कस्थान, म्यानमार आणि इथिओपिया हे प्रमुख हरभरा उत्पादक देश आहेत. क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तान व्दितीय क्रमांकावर आहे. भारतात एकूण अंदाजे 12 दश लक्ष्य हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली असून या पिकापासून अंदाजे 40 मेट्रिक टन उत्पादन मिळते. पिकाची हेक्टरी उत्पादकता 915 किलोग्रॅम इतकी आहे. याचाच अर्थ असा की, भारतात हरभरा लागवडीस व उत्‍पादनास मोठा वाव आहे, मात्र प्रति हेक्‍टरी उत्‍पादकता कमी आहे. 

हवामान कसे असावे ?  

हरभरा पीक‍ उष्णसमशीतोष्ण कटिबंधातील  असल्यामुळे या पिकाला विशेषत: 20 दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान 100 अंश ते 150 अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान 250 अंश ते 300 अंश सें.ग्रे. असावे लागते. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. त्यामुळे असे वातावरण हरभरा पिकास पोषक व वाढीसाठी उत्तम ठरते. 

जमीन कशी असावी ? 

हरभरा पीक मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक 700 ते 1000 मि.मी. पर्जन्यमान असणाऱ्या भागातील जमिनीत जिरायती हंगामात हरभरा चांगला येतो. हालकी, चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.  उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपण अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये.

पूर्व मशागत कशी करावी ?  

पीक लागवडीसाठी व पेरणीपूर्वी जमिनीत जी मशागत केली जाते त्‍या मशागतीस पूर्वमशागत असे म्‍हणतात. हरभरा पीक आपल्याडे रब्बी हंगामात येत असल्यामुळे त्याला फारशी पूर्व मशागतीचे कामे करण्याची गरज भासत नाही, परंतु हरभरा पेरणीपूर्व मशागतीचे कामे करताना जमिनीत योग्‍य प्रमाणात ओलावा असणे गरजेचे असते. पिकाची लागवड करीत असताना जमिनीची खोलवर नांगरणी, बैलाच्‍या दोन ते तीन पाळ्या देणे, जमिनीत सेंद्रिय खते चांगले मिसळून टाकणे लागवडीपूर्वी जमिनीत तणनाशकाचा वापर करणे इत्‍यादी महत्‍त्‍वाची कामे करावी लागतात. त्यामुळे हरभरा पिकाचे उत्पादन चांगले घेणे शक्य होईल.  

हरभरा पिकांचे सुधारित वाण कसे निवडावे? 

कोणत्‍याही पिकाचे उत्‍पादन हे बियाणे, जाती व त्‍यातील असलेल्‍या आनुवंशिक व भौतिक गुणधर्मावर आधारित असते. म्‍हणून पिकाचे दर्जेदार व अधिकाधिक उत्‍पादन घ्‍यावयाचे असेल तर सुधारित वा संकरित जातींचा प्राधान्‍याने लागवडीसाठी अवलंब करावा. हरभरा पिकाच्‍या चाफा, अन्निगेरी,एन 59, बी.डी.एन. 9/3 विकास असे जुने वाण रोगाला बळी पडतात म्हहणून जुने अथवा स्थानिक वाण न वापरता सुधारित वाण पेरणीसाठी वापरावे. विश्वास हा चांगला उत्पादन देणारा वाण आहे. तथापि अलीकडे या वाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने या वाणाऐवजी नवीन वाण विशाल, दिग्विजय हे वाण पेरणीसाठी वापरावे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय हे वाण अतिशय चांगले आहेत. काबूली वाणामध्ये विराट, काक 2 हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत.

वाचा : हरभरा पिकाचे सुधारित वाण

हेक्‍टरी बियाणे किती असावे?

हरभरा पिकाचे उत्‍पादन घेताना जमिनीच्‍या प्रकारानुसार बियाण्‍याच्‍या प्रमाणात फरक पडत असतो. हरभऱ्यामध्‍ये विविध जातींच्‍या बियाण्‍याचा आकार‍ भिन्‍न आहे त्‍यामुळे हरभऱ्याच्‍या जतीनुसार बियाण्‍यांचे पेरणीतील प्रमाण वेगवेगळे आहे.

हरभऱ्याचे सुधारीत वाणाचे हेक्‍टरी  बियाणे प्रमाण  

अ.क्र.वाणहेक्‍टरी बियाणे (किलो)
1बीडीएन 9-3, फुले जी-1260-65
2विकास, विजय65-70
3विश्‍वास, विशाल, श्‍वेता, विराट,दिग्विजय, पीकेव्‍ही-260-65

बीजप्रक्रिया कशी करावी ? 

कोणत्‍याही बियाण्‍यास पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्‍यंत गरजेचे असते. त्‍यामुळे बियाण्‍याची उगवण क्षमता वाढते व बियाण्‍यास कीड व रोगापासून संरक्षण होते. यामुळे हरभऱ्याची सुध्‍दा बीजप्रक्रिया करावी लागते. पेरणीपूर्वी हरभऱ्याच्या प्रतिकिलो बियाण्यास 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा 2 ग्रॅम थायरम व 2 ग्रॅम कार्बन्डेझिम एकत्र करून प्रतिकिलो बियाण्यास चोळून बीजप्रक्रिया करावी. त्‍यानंतर जिवाणू संवर्धन रायझोबियम 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्‍यास लावून चोळावे आणि काही वेळ बियाणे सुकविण्‍यासाठी ठेवावे. व त्‍यानंतर लगेच पेरणी करावी. 

लागवड हंगाम व कालावधी

हरभऱ्याची पेरणी आपल्‍याकडे रब्‍बी हंगामात करतात. सर्वसाधारणपणे 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्‍हेंबर या कालावधीत हरभऱ्याची पेरणी होणे आवश्‍यक आहे. यानंतर सुध्‍दा हरभऱ्याची पेरणी करता येते मात्र उत्‍पन्‍नात घट येते. त्‍यामुळे दर्जेदार उत्‍पादन घ्‍यावयाचे असेल तर हरभऱ्याची पेरणी शक्‍यतो वेळेवर करावी. हरभरा पीक भारतात व महाराष्‍ट्रात प्रामुख्‍याने दोनच हंगामात घेतले जाते. रब्‍बी व बागायती हंगामाचा समावेश होतो. या हंगामातील हवामानुसार वेगवेगळ्या हंगामात वेगळी पिके घेता येतात.

अ) रब्‍बी हंगाम : 15 नोव्‍हेंबर 15 जानेवारी पर्यंत 

ब) बागायती : 20 ऑक्‍टोबर ते 15 नोव्‍हेंबर पर्यंत

हरभरा पेरणी कशी करावी 

जिरायत क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी 10 सें.मी. खोलवर करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्‍याची सोय असल्‍यामुळे हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्‍हेंबर दरम्‍यान करतात. तसेच बागायती क्षेत्रात कमी खोलीवर 5 सें.मी. हरभऱ्याची पेरणी केली जाते. पेरणी लवकर किंवा उशीरा केल्‍यास पीक उत्‍पादनात घट होऊन नुकसान होते. त्‍यामुळे पेरणी वेळेवरच करावी लागते. पेरणी लवकर केल्‍यास बियाण्‍याची उगवण क्षमता घटते तर पेरणीस उशीर झाल्‍यास जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतोव बियाणे ओलाव्‍या अभावी उगवत नाही. तसेच पिकाच्‍या वाढीसाठी आवश्‍यक तेवढी थंडी मिळत नाही. त्‍यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फूले व घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. आणि दोन रोपातील अंतर 10 सें.मी. राहील व काही काबूली वाणासाठी दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन रोपातील अंतर 15 सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी.

अ) हरभऱ्याची पारंपारिक पेरणी पद्धती 

1) पेरणी (ड्रिलिंग)

आपल्‍याकडे अजूनही हरभरा या पिकाची पेरणी पारंपारिक पद्धतीने केली जाते. सामान्यत: देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने दोन ओळीतील अंतर 30 सेंमी रहावे व दोन रोपातील 10 सेंमी अंतरावर करतात. या प्रकारे पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे हेक्टरी 65 ते 70 किलो तर विशाल, विराट किंवा पी.के.व्ही – 2 या वाणांचे हेक्टरी 100 किलो बियाणे पुरेशे लागते. भारी जमिनीत 90 सेंमी रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरब्यांच्या दोन्ही बाजूला 10 सेंमी अंतरावर 1 ते 2 दाणे टोकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करुन वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.   

2) टोकण पद्धत (डिबलिंग)

महाराष्‍ट्रात हरभरा पिकाची लागवड ही टोकण पद्धतीने केली जाते. टोकण पद्धतीचा वापर भारी जमिनीत व बागायती क्षेत्रात प्रामुख्‍याने केला जातो. भारी जमिनीत 90 सें.मी. रूंदीच्‍या सऱ्या सोडतात आणि वरब्‍यांच्‍या दोन्‍ही बाजूस 45 X 10 सें.मी. अंतरावर 1-2 बिया टोकूण लागवड केली जाते. काबूली हरभऱ्याच्‍या लागवडीसाठी टोकण पद्धतीचा महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणावर वापर करतात. टोकण पद्धतीने हरभरा पिकाची लागवड करण्‍यासाठी 45-50 किलो प्रति हेक्‍टरी बियाण्‍याची गरज लागते. टोकण पद्धतीमुळे लागवडीच्‍या बियाण्‍याची बचत होते व उत्‍पादनात चांगली वाढ होते.

ब) हरभऱ्याची आधुनिक पेरणी पद्धती 

1) बैलचलित पेरणी यंत्र 

केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्‍था (CRIDA), हैद्राबाद येथे विकसित केलेले बैलचलित बहुपीक टोकण यंत्र आहे. हे यंत्र दोन, तीन किंवा चार फणामध्‍ये उपलब्‍ध आहे.

सोयाबीन, तूर, मका, हरभरा, भुईमूग, ज्‍वारी, उडीद, मूग, बाजरी, वाटाणा व गहू इ. पिकाच्‍या पेरणीसाठी वापरता येते. यामध्‍ये बियाण्‍यासाठी व खतांसाठी वेगळी व्‍यवस्‍था केलेली आहे. प्‍लॅस्टिक तबकड्याद्वारे बियाणे पाडण्‍याची क्रीया केली जाते. त्‍यामुळे खत व बियाणे योग्‍य प्रमाणात नियंत्रित होते.  या यंत्राने पेरणी केल्‍यास एका दिवसात  1 ते 1.5 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी करता येते.

2) ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र 

महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी यांनी विकसित केलेले हे पेरणी यंत्र ट्रॅक्‍टरचलित असून या यंत्राने ज्‍वारी, सूर्यफूल, करडई, मका, हरभरा, सोयाबीन इ. पिकांची पेरणी करता येते. ट्रॅक्‍टर चलित पेरणीयंत्र हे बैचलित पेरणी यंत्राप्रमाणे आहे. फक्‍त यामध्‍ये बियाणे व खतांच्‍या पेटीचा आकार वाढविलेला आहे. या यंत्रामध्‍ये बियाणे नियंत्रित करण्‍यासाठी प्‍लॅस्टिक रोटर वापरले आहेत. खत नियंत्रणासाठी फ्युटेरोलरची सोय आहे. यामध्‍ये दोन फणांतील अंतर कमी-जास्‍त करता येते. या यंत्राणे 6 ते 9 ओळी एका वेळेस पेरणी करता येतात. या यंत्राने 10 ते 12 एकर क्षेत्र एका दिवसात पेरणी करता येते. ट्रॅक्‍टरद्वारे पेरणी केल्‍यास मनुष्‍याची गरज भासत नाही. कमी वेळात व कमी श्रमात जास्‍त क्षेत्र पेरणी करता येणे सुलभ झाले आहे. ज्‍या ठिकाणी शेतमजूरांचा अभाव आहे अशा ठिकाणी या पद्धतीने हरभरा पिकाची पेरणी केली जाते.

आंतरमशागत कशी करावी ?

शेतात पीक उभे असतांना जी मशागत करतात तिला आंतरमशागत असे म्‍हणतात. एखादे पीक पेरणीनंतर त्‍या पिकाच्‍या काढणीपर्यंत त्‍या पिकामध्‍ये जी मशागत केली जाते त्‍या मशागतीला आंतरमशागत असे म्हणतात. हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी व उत्तम उत्‍पादनासाठी शेत हे सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी आंतरमशागतीचे कामे करावी लागतात. हरभऱ्यात तणे काढणे, खुरपणी करणे,  झाडांची विरळणी अथवा नांगे भरणे, पीकसंरक्षण, खते व सूक्ष्‍म अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा, पाणी देणे, आदी कामांचा समावेश होतो.  

आंतरपिके कोणते घ्यावे ?

आंतरपीक म्‍हणजे मुख्‍य पिकांबरोबरच इतर कमी कालावधीचे घेतले जाणारे दुय्यम पिकास आंतरपीक असे म्‍हणतात. आंतरपीक पद्धतीत एकाच शेतात, एकाच हंगामात दोन पिके घेण्‍यात येतात. त्‍यात एक प्रमुख पीक असते, तर दुसरे दुय्यम पीक असते. पिकांची पेरणी ओळींच्‍या ठराविक प्रमाणात केली जाते.

हरभरा हे पीक कमी कालावधीचे (110 दिवस) असल्‍यामुळे जास्‍त करून यात आंतरपिकांचा समावेश कमी प्रमाणात होतो, तर ऊस, तूर, ज्‍वारी यामध्‍ये आंतरपीक म्‍हणून घेतले सर्रास जास्‍त प्रमाणात घेतले होते. तथापि हरभरा हे रब्‍बी हंगामात पीक येत असल्‍याने हरभरा पिकाबरोबरच मोहरी, करडई, ज्वारी इ. आंतरपीक घेता येते. हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सें.मी. अंतरावर हरभऱ्याची एक ओळ टोकण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते.

आंतरपीक उत्‍पन्‍न किती मिळते ? 

हरभरा पिकात इतर दुय्यम पीक हरभरा+ मोहरी, हरभरा+करडई तसेच ऊसामध्‍ये देखील हरभरा सरी/वरंबावर घेतला जातो. वेगवेगळ्या पीक लागवडीचे आंतर वेगळे असते. कारण दुय्यम पीक मुख्‍य पिकांवर अन्‍नद्रव्‍ये तसेच जमिनीतील ओलावा शोषून घेण्‍यासाठी स्‍पर्धा करणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून उत्‍पादनात घट होणार नाही.

खत व्‍यवस्‍थापन कसे करावे ?  

हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात, त्‍यासाठी खताची मात्रा योग्‍य प्रमाणात देणे गरजेचे आहे. पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र, 50 किलो स्‍फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी म्‍हणजेच 125 किलो डायअमोनियम फॉस्‍फेट डी.ए.पी. अधिक 50 किलो स्‍फुरद म्‍युरेट ऑफ पोटॅश अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्‍फेट अधिक 50 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्‍टरी द्यावे. संतुलित खतांच्‍या वापरामुळे उत्‍पादनात अंदाजे 18.55 टक्‍के इतकी वाढ झाल्‍याचे आढळून आले आहे. पीक फुलोऱ्यात असताना 2 टक्‍के युरियाची पहिली फवारणी करावी आणि नंतर 10-15 दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. त्‍याम