
के.एस. ॲग्रोवन विषयी
के.एस. ॲग्रोवन हा महाराष्ट्रातील कृषीभिमुख घटकांची निगडीत विश्वासार्ह ब्लॉग आहे. मॉडर्न ॲग्रोटेक हा ब्लॉग सन 2019 साली Covid-19 लॉकडाऊन परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी तयार केला होता. त्यानंतर या ब्लॉग चे रूपांतर सन एप्रिल 2024 मध्ये के.एस. ॲग्रोवन मध्ये करण्यात आले आहे. के.एस. ॲग्रोवन फाउंडर तथा एडमिन श्री.किशोर मोतीराम ससाणे असून ते कृषी पदवीधर व शेतीविषयक अभ्यासक आहेत.
के.एस. ॲग्रोवन ब्लॉग हा मराठी भाषेत असून डॉ. योगेश सोमठाणे यांच्या कल्पक वृत्तीने इंग्रजी व हिंदी या भाषेत काही आर्टिकल पब्लिश करण्यात आले आहेत. जे गुगल सर्च इंजिन मध्ये चांगल्या ठिकाणी रँक करत आहेत. देशाची हिंदी ही राजभाषा असून इंग्रजीमध्ये संशोधन मोठ्या प्रमाणावर झाले असून मुबलक सामग्री उपलब्ध असल्यामुळे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचा अंतर्भाव या ब्लॉगमध्ये करण्यात आलेला आहे. ज्याचा उद्देश कृषि विद्यापीठातील संशोधनाचा प्रसार करणे, अद्यावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, कृषी वाचक संख्या वाढवणे, वाचकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ करणे असा आहे.
शेतीच्या सर्व पैलूंशी संबंधित हे अधिकृत माध्यम आहे. नवीन ट्रेंड, चांगल्या पद्धती आणि भविष्यातील तांत्रिक अनुप्रयोग स्पष्टपणे सादर केले जातात. मुख्य शेती, पीक लागवड तंत्रज्ञान, पिकांचे सुधारित वाण, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान, कृषिप्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपनी, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय इत्यादी सारख्या कृषी आधारित उपक्रमांचा समावेश आहे.
श्री. किशोर मोतीराम ससाणे