करडई हे महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. सोयाबीन व सूर्यफूल पिकाच्या खालोखाल या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात घेतले जाते. तसेच करडईचा तेलनिर्मितीसाठी तर उपयोग होतोच, परंतु जनावरांसाठी लागणारी पेंड सुध्दा चांगल्या प्रकारची तयार होते. म्हणून करडई पिकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अलीकडच्या काळात महाराष्ट्रात करडईची पिकाची प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता कमी आलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजेच लागवडीसाठी सुधारित वाणांचा उपयोग केला जात नाही, परिणामी पीक उत्पादनात लक्षणीय घट येऊन आर्थिक उत्पादनात तोटा सहन करावा लागतो. याकरिता करडईचे सुधारित वाणांची माहिती शेतकरी बांधवांना असणे अत्यंत असते.
करडईचे सुधारित वाण यालेखाआधारे आपणास करडईची पिकाच्या सुधारित वाणांची ओळख होईल. करडईच्या विविध जातींची उत्पादन व उत्पादकता अशी तुलना करता येईल. लागवडीसाठी कोणती जात निवडावी याची माहिती शेतकरी बांधवांना होईल त्यामुळे त्यांचे प्रती हेक्टरी क्षेत्र वाढून पीक उत्पादनात चांगली वाढ होईल.
करडई लागवडीसाठी वाण कसा निवडावा ?
- ज्या वाणांची आनुवंशिक व भौतिक शुद्धता उत्तम असेल.
- जो वाण अवर्षणग्रस्त व कोणत्याही जमिनीत येणारा असावा.
- जो वाण कीड व रोगांस प्रतिकारक्षम असेल.
- ज्या वाणांचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता अधिक असेल.
- वाण काढणी व हाताळणी सुलभ असल्याचा पाहिजे.
- बीनकाटेरी वाण असल्यास अधिक उत्तम.
करडई लागवडीसाठी कोणता वाण वापरावा ?
1) शारदा (बीएसएफ-168-4)
परिपक्व कालावधी : 127 दिवस
एकरी बियाणे : 4 ते 5 किलो
वैशिष्टये : कोरडवाहू लागवडीस योग्य. जास्त फांदया फुटतात. फुले पिवळसर लाल असून तेलाचे प्रमाण 30 टक्के.
उत्पादन : सरासरी 16-18 क्विंटल प्रती हेक्टरी.
2) अनेगिरी -1
परिपक्व कालावधी : 130 दिवस
एकरी बियाणे : 4 ते 5 किलो
वैशिष्टये : मावा किडीस काही प्रमाणात प्रतिकारक्षम असून तेलाचे प्रमाण 29 टक्के इतके आहे.
उत्पादन : सरासरी 14-16 क्विंटल प्रती हेक्टरी.
3) नारी-6
परिपक्व कालावधी : 135 दिवस
एकरी बियाणे : 4 ते 5 किलो
वैशिष्टये : बिनकाटेरी वाण आहे. पानावरील ठिपक्या रोगास प्रतिकारक्षम आहे. पाकळया गोळा करण्यास सोयीस्कर असून तेलाचे प्रमाण 30 टक्के इतके आहे.
उत्पादन : सरासरी 12-15 क्विंटल प्रती हेक्टरी.
4) परभणी कुसूम (पीबीएनएस-12)
परिपक्व कालावधी : 135 दिवस
एकरी बियाणे : 4 ते 5 किलो
वैशिष्टये : कोरडवाहू व बागायतीस योग्य वाण आहे. मर व पानावरील ठिपके रोगास प्रतिकारक आहे. मावा किडीस कमी बळी पडते. दाणे टपोरे असून तेलाचे प्रमाण 29 टक्के इतके आहे.
उत्पादन : कोरडवाहू सरासरी 12-15, बागायती 20-22 क्विंटल प्रती हेक्टरी.
5) फुले कुसूम 135 (जे.एल.एस.एफ. -414)
प्रसारित वर्ष : 2003
संशोधन संस्था : करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर
परिपक्व कालावधी : 125 ते 140 दिवस
एकरी बियाणे : 4 किलो
वैशिष्टये : बागायत लागवडीस योग्य. तेलाचे प्रमाण 29 टक्के मावा किडीस मध्यम प्रतिकारक आहे. फुलाचा रंग उमलताना पिवळा व वाळल्यानंतर लाल होतो. तेलाचे प्रमाण 30 टक्के इतके आहे.
उत्पादन : कोरडवाहू सरासरी 13 ते 15 व बागायती 20 ते 22 क्विंटल प्रती हेक्टरी.
6) परभणी– 40 (पीबनीएनएस-40)
परिपक्व कालावधी : 135 ते 138
एकरी बियाणे : 4 ते 5 किलो
वैशिष्टये : बिन काटेरी वाण आहे. कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य आहे. पाकळया गोळा करण्यास सुलभ आहे. पानावरील ठिपके व मर रोगास सहनशील आहे.
उत्पादन : कोरडवाहू सरासरी 15-16, बागायती 20-22 क्विंटल प्रती हेक्टरी.
7) परभणी- 86 (पुर्णा)
परिपक्व कालावधी : 120 ते 130 दिवस
एकरी बियाणे : 4 ते 5 किलो
वैशिष्टये : हा वाण मराठवाडा विभागातील कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी प्रसारित करण्यात आला. सरासरी बोडांची व बियांची संख्या जास्त असते. हा वाण मर/ उबळ या रोगास व मावा या किडी सहनशील आहे. वाण पानावरील ठिपके (अल्टरनेरिया) रोगास सहनशील. बियाणामधील तेलाचे प्रमाण 30 टक्के इतके आहे.
उत्पादन : कोरडवाहू सरासरी 10 ते 12, बागायती 18 ते 20 क्विंटल प्रती हेक्टरी.
8) फुले कुसुम
प्रसारित वर्ष : 2003
संशोधन संस्था : करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर
परिपक्व कालावधी : 125 ते 140 दिवस
बियाणे : 4 ते 5 किलो
वैशिष्टये : मावा किडीस मध्यम प्रतिकारक आहे. फुलाचा रंग उमलताना पिवळा व वाळल्यानंतर लाल होतो. तेलाचे प्रमाण 30 टक्के इतके आहे.
उत्पादन : कोरडवाहू सरासरी 13 ते 15, बागायती 20 ते 22 क्विंटल /हेक्टरी.
9) करडई- गिरणा
प्रसारित वर्ष : 1990
संशोधन संस्था : करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर
परिपक्व कालावधी : 130 ते 135 दिवस
बियाणे : 4 किलो
वैशिष्टये : मावा किडीस मध्यम प्रतिकारक आहे. मर रोगास मध्यम प्रतिकारक आहे. तेलाचे प्रमाण 28-30 टक्के इतके असून महाराष्ट्रातील खानदेश भागात लागवडीसाठी शिफारस आहे.
उत्पादन : कोरडवाहू सरासरी 13 ते 15, बागायती 20 ते 22 क्विंटल /हेक्टरी.
करडईच्या सुधारित वाणामुळे होणारे फायदे?
- करडईच्या बियाण्याची उगवण चांगली होते.
- करडईची कोरडवाहू क्षेत्रावर चांगल्या प्रकारे लागवड करता येते.
- सुधारित वाण रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देतात.
- करडई पिकाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढते.
- सुधारित वाणांस बाजारात चांगला दर मिळतो.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
करडईचे सुधारित वाण हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech सब्सक्राईब करावे.