Friday, December 6, 2024

Top 5 This Week

Related Posts

मळणी यंत्राची रचना व देखभाल

वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ (कृषी शक्ती व अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म जळगाव

कृषी यांत्रिकीकरणामध्ये मळणी यंत्र हे एक प्रमुख यंत्र आहे. मळणी यंत्राद्वारे आपल्याकडील ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, जवस इ. पिकांची मळणी खूप चांगल्या प्रकारे करता येते.  मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना, त्याचा वापर कसा  करावा याची माहिती असणे आवश्यक असते. मळणी यंत्र वर्षभर वा सतत चालणारे यंत्र नाही ते हंगातील सुगीपुरतेच चालत असल्यामुळे त्याची निगा व देखभाल कशी राखावी याबाबतची सविस्तर माहिती प्रस्तुत मळणी यंत्राची रचना व देखभाल या लेखाद्वारे आपणास मिळणार आहे.

कृषि यांत्रिकीकरणाचे महत्त्व :

शेतीचे उत्पन्न वाढविणे कृषि अवजारे व यंत्रामुळे शक्य झालेले आहे. त्यामुळे कमी वेळेत शेतीची मशागत करणे, कमी कालावधीत पिकांची पेरणी करणे, कमी कालावधीत पिकांची काढणी, मळणी करणे अत्यंत सुलभ झाले असून त्यामुळे शेतकरी बांधवांचे कष्ट व मेहनत कमी होऊन उत्पादनात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतीविकासात कृषि यांत्रिकीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

मळणी यंत्राची रचना कशी असते?

मळणी यंत्रामध्ये ड्रम, सिलेंडर, चाळणी आणि पंखा या घटकांचा समावेश असतो.

  • ड्रम : मळणी यंत्रातील ड्रम बर्हिगोल असतो. या ड्रममध्येच शेंगा, कणीस, अवेष्ट्यांचे दाणे वेगळे केले जातात.
  • सिलेंडर : ड्रमच्या आतील भागात सिलेंडर बसविलेला असून दाणे वेगळे करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दाते बसविलेले असतात.
  • चाळणी : वेगवेगळ्या पिकानुसार (दाण्याच्या आकारानुसार) वापरल्या जातात.
  • पंखा : पंखा हा चाळणीखाली बसविलेला असतो. यांच्या सहाय्यानेदाण्यापासून भुसा वेगळा केला जातो व भुसा जनावरांसाठी खाद्यम्हणून वापरला जातो.

मळणी यंत्राची कार्यपद्धती कशी चालते?

सर्वसाधारण मळणी यंत्रातील सिलेंडर आणि पंखा एकाच वेळी ट्रॅक्टर, इंजीन, पावर टिलर किंवा इलेक्ट्रिक मोटारच्या शक्तीचा वापर करून फिरवले जातात. कणसे किंवा ओंब्या जेव्हा वेगाने फिरणाऱ्या सिलेंडर आणि स्थिर ड्रममध्ये येतात तेव्हा घर्षणामुळे दाणे वेगळे होतात व चाळणी पडतात आणि पंख्याच्या सहाय्याने भुसा वेगळा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे स्थिर ड्रम व सिलेंडर यांच्यातील अंतर पिकानुसार कमी-जास्त (अॅडजस्ट) करावे, त्यामुळे मळणी यंत्राची कार्यक्षमता वाढते.

मळणी यंत्राच्या कार्यपद्धतीचे तंत्र व देखभाल

मळणी ड्रमची गती कशी निवडावी :

मळणी ड्रमची गती वाढविल्यास लागणारी ऊर्जा व दाणे तुटण्याचे प्रमाण कमी होते, परंतु एकूण धान्याचा अपव्यय वाढतो. यात स्वच्छ धान्य, मळणी झालेले धान्य तसेच मळणी न करता वाया गेलेले धान्य याचा समावेश होतो. याउलट ड्रमची गती कमी केल्यास मळणी यंत्राची क्षमता, धान्य स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते व धान्य वाया जाण्याचे प्रमाण वाढते. ब्यूरो ऑफ इंडिया स्टॅण्डर्ड (BIS) ने प्रमाणित केल्यानुसार मळणी यंत्राद्वारे होणारे एकूण धान्य तोटा हा ५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, तसेच दाणे फुटण्याचे प्रमाण २ टक्क्यापेक्षा कमी असावे.

पिकनिहाय मळणी ड्रमची गती :

       आपल्याकडील सर्वसाधारण पिकांमध्ये मळणी यंत्राच्या ड्रमची गती पुढील प्रमाणे ठरविण्यात आलेली आहे.

अ.क्रपिकाचे नावड्रमची गती (मी. सेकंद)
1सोयाबिन8 ते 10
2बाजरी15 ते 20
3ज्‍वारी15 ते 20
4मका9 ते 12
5गहू20 ते 25
6भात15 ते 20

मळणी यंत्राची देखभाल घेतल्यामुळे होणारे फायदे :

  • मळणी यंत्राची आयुष्य वाढण्यास मदत होते.
  • मळणी यंत्र दीर्घकाळ कार्यक्षम राहण्यास मदत होते.
  • मळणी यंत्राची देखभाल व दुरूस्तीच्या खर्चात बचत होते.
  • नियमित वापरामुळे यंत्राची झीज कमी होते.

वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ (कृषी शक्ती व अभियांत्रिकी), कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्म जळगाव

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

admin
adminhttps://www.ksagrowon.in
Kishor Motiram Sasane, (B.Sc. Agriculture)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles