डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची कर्ज योजना आहे. नियमित व रितसर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
वाचा : कृषी सुवर्ण कर्ज योजना
महाराष्ट्रात अल्प, अत्यल्प व बहुभाधारक शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे. याबद्दल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती मिळावी, त्यांना कर्जाचा लाभ घेता यावा या उद्देशाने सदर लेख तयार करण्यात आला आहे.
वाचा : महिला बचत गटासाठी शासकीय योजना
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेत विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक १ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत ३ टक्के व्याज सवलत दिली जाते.
- तर १ ते ३ लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत व्याजदरात १ टक्का सवलत देण्यात येत होती. त्यात आता १ ते ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी अल्प डॉ. पंजाबराव देशमुख मुदत पीककर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २ टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत १२ जून २०२१ रोजी घेण्यात आला.
- त्यानुसार आता विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत्या कर्जावर सरसकट ३ टक्के व्याज सवलत राज्य शासनामार्फत मिळेल.
- केंद्र शासनामार्फत ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड जर केली, तर २ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. त्यामुळे आता २०२१-२२ पासून शेतकऱ्यांना ३ लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड ही मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. म्हणजेच त्यांना पीककर्ज हे शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे फायदे
- व्याजात सवलत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची मुदतीत परतफेड करतील, त्यामुळे बँकांची वसुली वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
- व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होईल.
- विहित मुदतीत कर्ज मिळाल्यामुळे कृषी निविष्ठांची खरेदी शक्य होईल.
- व्याज सवलत योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढ मिळण्यास मदत होईल.
- बहुसंख्य शेतकऱ्यांचे खाजगी सावकारी कर्ज घेण्याचे प्रमाण कमी होईल.
- व्याज सवलत योजनेमुळे शेतकऱ्यांचे हित जोपासण्यास मदत मिळेल.
डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.