Friday, December 6, 2024

Top 5 This Week

Related Posts

हायड्रोपोनिक चारा नियोजन कसे करावे ?

सध्य जनावरांसाठी लागणारा पोषक चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे पशुपालकांना चाऱ्याचा प्रश्न सतत भेडसावत असतो, परिणामी त्यांना दुग्धव्यवसाय करणे व जनावरांना वर्षभर चाऱ्याचे नियोजन कठीण होते. याला उत्तम पर्याय म्हणून हायड्रोपोनिक चाऱ्याचे नियोजन केल्यास मुबलक प्रमाणात पर्यायी चारा उपलब्ध होईल आणि जनावरांची भूक भाकेल शिवाय दुग्धव्यवसायास चालना मिळेल.

पोषक चाऱ्याचे नियोजन कसे करावे ?

ज्या वेळेस आपण धान्य भिजत घालून त्याला मोड आणतो, त्यावेळेस या धान्यातील बरेचसे अन्नघटक ह अवघड माध्यमातून पचनासाठी योग्य असणाऱ्या सोप्या माध्यमात रूपांतरीत होतात. तसेच बरेच घटक जे शरीरातील इतर अन्नघटकांचे पचन घडवून आणण्यासाठी आवश्यक आहेत, ते कार्यान्विते होतात. व त्यामुळे शरीरातील बऱ्याच प्रक्रिया या व्यवस्तिपणे चालतात.

हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेल्या चाऱ्यात पूर्वी असलेले घटक तर कार्यान्वित होतातच आणि ते शरीरास अधिकाधिक उपलब्ध होतात. असा चारा जनावरांना खाण्यास आवडणारा व चांगल चवीचा असतो. या चाऱ्याची पचनीय क्षमता बऱ्यापैकी वाढलेली असते.

काही प्रकारची धान्ये आपण जनावरास आहे तशी खायला देऊ शकत नाही कारण अशा कच्चा धान्यात काही असे घटक असतात की जे जनावरांच्या शरीरासाठी अपायकारक असतात. परंतु असेच धान्य मोड आणल्यानंतर किंवा हायड्रोपोनिक चाऱ्यात रूपांतरीत झाल्यास जनावरांच्या शरीरासाठी अपायकारक असण्यापेक्षा उपयोगी होतात.

उदाहरणार्थ, कच्चे सोयाबीन जनावरांना आहारात देऊ शकत नाही कारण त्यात ट्रिप्सीन इनहिबिटर हे घातक रसायन असते. हे शरीरात पचनासाठी मदत करणाऱ्या ट्रिप्सीनचा पुरवठा थांबवते. परंतु जर सोयाबीनचा हायड्रोपोनिक चारा तयार केला किंवा मोड आणून जनावरांच्या आहारात दिल्यास असे घातक रसायन तयार होत नाहीत तर अनेक महत्वाची अमिनो आम्ले ही सोप्या माध्यमात शरीरात पचनासाठी उपलब्ध होतात.

हायड्रोपोनिक चारा हा पौष्टिक व लुसलुशीत असून त्याची चव चांगली असल्याने जनावरे हा चारा आवडीने खातात. त्यापासून दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, जनावराची रोगप्रतिकार शक्ती, जनावराची त्वचा, गाभण राहण्याचे प्रमाण, जनावराची चयापचयाची क्रिया असा सर्वांगीण फायदा होतो. या सर्व कारणांमुळे हायड्रोपोनिक चारा हा जनावरांसाठी हा चांगला आहार असतो.

जनावरास त्याच्या वजनाच्या २.५ ते ३% इतका (शुष्क स्वरूपात) वजनाचा आहार उपलब्ध होणे आवश्यक आहे. ५०० किलो वजन असणाऱ्या जनावरास एकूण १५ किलो (शुष्क स्वरूपात) आहार देणे आवश्यक आहे, असा सर्वसाधारण नियम आहे. याप्रमाणे पहिले तर वरील आहाराच्या २/३ आहार हा चाऱ्यातून तर १/३ आहार हा खुराकामधून देणे आवश्यक आहे. वरील सर्व आहार हा शुष्क स्वरूपात दाखवण्यात आला आहे.

हायड्रोपोनिक चाऱ्याचे उपयोग कसा करावा ?

हायड्रोपोनिक चारा हा उत्तम पर्यायी खाद्य म्हणून पुढे येतम आहे. याचबरोबर इतर सुकार व ओला चारा याचे व्यवस्थापन केल्यास चाऱ्याचे चांगले नियोजन करता येऊ शकेल. अशाच आहारानुसार जर आपण स्वरूप ठरवले तर पुढीलप्रमाणे चारा देण्याचे ‍नियोजन करावे लागले :

) सुका चारा

सुक्या चाऱ्यात सर्वसाधारण १०% पाणी असते. आपणास ५०० किलो जनावरासाठी एकूण १५ किलो आहार द्यावा लागेल आणि त्यापैकी २/३ म्हणजे १० किलो अन्नघटक हे चाऱ्यातून द्यावे लागतील.

या १० किलो चाऱ्यापैकी २/३ अन्नघटक हे सुक्या चाऱ्यातून देणे आवश्यक आहे. म्हणजे ६.७ किलो चारा द्यावा लागेल. हे वजन शुष्क आधारावर (पाणी विरहित) असल्याने सुक्या चाऱ्यात १० टक्के पाणी असते. म्हणून आपण ६.५ मध्ये १०% मिळवल्यास प्रत्यक्ष आहारात सुका चारा किती द्यावयाचा आहे, हे निश्चित समजेल. अशा पद्धतीने ७.४ किलो आहार हा सुक्या चाऱ्याचा द्यावा लागेल.

) हिरवा चारा

वरीलप्रमाणे आहाराचे नियोजन केले तर एकूण चाऱ्याच्या १/३ भाग म्हणजे ३.३ किलो (शुष्क प्रमाणात) घटक हे हिरव्या चाऱ्यातून द्यावे लागतीत. आता हिरव्या चाऱ्यातील पाण्याच्या प्रमाणाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे ‍हिरव्या चाऱ्यात ८०% पाण्याचे प्रमाण असते. यावरून आपणास शुष्क प्रमाणात ३.३ किलो हिरवा चारा म्हणजे प्रत्यक्षात तो ८०% जास्त म्हणजे १३.२ किलो हिरवा चारा द्यावा लागेल.

) खुराक

वरील नियमाप्रमाणे खुराकाचे प्रमाण पाहिले तर एकूण आहाराच्या १/३ म्हणजे ५ किलो (शुष्क प्रमाणात) घटक हा खुराकातून द्यावा लागेल. जेणेकरून जनावरांची भूक भागेल व दूध उत्पादनात वाढ होईल.

हायड्रोपोनिक चाऱ्याचे नियोजन केल्यामुळे होणारे फायदे

  • चाऱ्याचा पर्यायी खाद्य स्वरूपात उपयोग होतो.
  • जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
  • दुधाळ जनावरांचे दूध देण्याचे प्रमाण वाढते.
  • दुधाची प्रत व गुणवत्ता उत्तम राखली जाते.
  • भेडसावणारा चाऱ्याचा प्रश्न कमी करता येतो.
admin
adminhttps://www.ksagrowon.in
Kishor Motiram Sasane, (B.Sc. Agriculture)

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles