पीएम किसान योजना-PM-Kisan Yojana, देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष रुपये 6,000/- हस्तांतरित केले जातात. मात्र खात्यास e-KYC न केल्याने सदर योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी e-KYC २०२४ मध्ये कशी करावी याविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
PM-Kisan योजनेतील ई-केवायसीच्या पद्धती
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी सन २०१९ मध्ये सुरु केलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही पूर्ण देशभरात चांगल्या प्रकारे कार्यान्वित झाली असून योजनेचा लाभ थेट लाभार्थी शेतकऱ्यांना होत आहे. यापुढे देखील या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. मात्र e-KYC (ई-केवायसी) न केलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. सदर योजनेचा लाभ त्यांना मिळण्यासाठी e-KYC करणे अत्यंत गरजेचे आहे.
PM-Kisan KYC (ई-केवायसी) कशासाठी ?
कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय पीएम किसान योजनेचा लाभ पात्र लाभार्थीना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचेल याची खात्री करण्यासाठी e-KYC प्रक्रिया आवश्यक आहे.
PM-Kisan KYC ई-केवायसी च्या विविध पद्धती ?
पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी चे खालील तीन पध्दती उपलब्ध आहेत:
- OTP आधारित e-KYC(पीएम किसान पोर्टल आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे.
- Biometrics- बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी (सामाईक सुविधा केंद्र (CSC) आणि राज्य सेवा केंद्र (SSK) येथे उपलब्ध)
- Face Authentication- फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसी (पीएम किसान मोबाइल अॅपवर उपलब्ध असून या अॅपचा वापर लाखो शेतकरी करतात).
अ) ओटीपी आधारित ई-केवायसी
ओटीपी (OTP) आधारित ई-केवायसी (e-KYC) कार्यान्वित करण्यासाठी, शेतकऱ्याकडे आधार लिंक केलेला सक्रिय मोबाईल नंबर (Mobile Number) असणे आवश्यक आहे. यासाठी खाली दिलेल्या क्रमवारीनुसार जावे :
- पीएम किसान पोर्टलला भेट द्या. (https://pmkisan.gov.in/)
- ई-केवायसी (e-KYC) वर क्लिक करा. ( वेबसाइटच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात)
- तुमचा आधार क्रमांक नमूद करा आणि तुमचा OTP नमूद करून तुमचे eKYC पूर्ण करा.
ब) बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी :
ही सुविधा देशभरातील सुमारे 4 लाखांहून अधिक सामाईक सुविधा केंद्रे आणि विविध राज्य सेवा केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या दारात / शेजारी या सेवा पुरविल्या जातील. यासाठी खाली दिलेल्या क्रमवारीनुसार करावी.
- तुमचे आधार कार्ड आणि आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरसह तुमच्या जवळच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) / राज्य सेवा केंद्रांना (SSK) ला भेट द्या.
- सामाईक सुविधा केंद्र (CSC) / राज्य सेवा केंद्र (SSK) मधील ऑपरेटर आधार- आधारित पडताळणी वापरून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात शेतकऱ्याला मदत करेल.
टीप:
- सर्वात जवळचे CSC https://locator.csccloud.in/ येथे उपलब्ध आहे.
- एका ई-केवायसी (e-KYC) साठी सुविधा शुल्क रु. 15/-
क) फेस-ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी:
शेतकरी स्वतःच्या सोयीनुसार त्यांच्या मोबाईलद्वारे ई-केवायसी देखील करू शकतो. ई-केवायसी करण्याचा हा सर्वात नाविन्यपूर्ण आणि त्रासमुक्त मार्ग आहे. क्रमवारी खाली दिली आहे.
- Google Play Store PM-KISAN Mobile App з Aadhaar Face RD App डाउनलोड करा.
- ॲप उघडा आणि तुमच्या पीएम किसान नोंदणीकृत मोबाइल नंबरद्वारे लॉग इन करा.
- लाभार्थी सद्यस्थिती पृष्ठावर जा (Beneficiary Status Page)
- ई-केवायसी स्थिती “No” (नाही) असल्यास, eKYC या बटणावर क्लिक करा, नंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी तुमची संमती द्या.
- तुमचा चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर, ई-केवायसी (e-KYC) पूर्ण होते.
टीप:
- कोणत्याही पद्धतीने केलेल्या ई-केवायसी ची स्थिती 24 तासांनंतर लाभार्थीच्या स्टेटस मध्ये दिसून येईल.
- पीएम किसान पोर्टल आणि किसान – eMitra (PM-KISAN AI चॅटबॉट) वरील KYS मॉड्युलवरून शेतकरी त्यांची स्थिती देखील पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क :
Pm-kisan ई-केवायसी करिताआवश्यक कागदपत्रे घेऊन तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी करता येईल.
Pm-kisan ई-केवायसी (e-KYC) करिता संपर्क ?
साबळे आपले सरकार सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर साबळे भिवराजमो.नं.7709582650
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas
Simply Sseven I just like the helpful information you provide in your articles
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.