जिद्द, मेहनत व शास्त्रोक्त प्रयोगातून नवनिर्मिती कायमच होत असते. या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मौ. नणंद गावचे प्रयोगशील शेतकरी श्री. बाबुराव देशमुख यांनी प्रायोगिक तत्त्वावर Apple Farming सफरचंद फळबागाची लागवड केली. पारंपरिक पिकांच्या तुलनेत सफरचंद शेती किफायतशीर ठरू शकते, असे त्यांनी त्यांचा अनुभव मांडला.
यवतमाळ जवळ राळेगाव तालुक्यातील संदीप हांडे यांचा आदर्श समोर ठेवून या शेतकऱ्यांनी मिरचीच्या जोडीला सफरचंदाची लागवड करून एक नवीन प्रयोगशील शेतकरी करून दाखवली आहे. यातून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. खरोखरच हा त्यांचा सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
प्रयोगशील शेतीला चालना देत निलंगा तालुक्यातील मौ. नणंद येथील श्री. बाबुराव देशमुख या शेतकऱ्याने चक्क Apple Farming सफरचंद लागवड यशस्वी केली आहे. एक एकर क्षेत्रावर तब्बल ४०० झाडांची लागवड त्यांनी केली असून, यंदा काही वैयक्तिक कारणास्तव त्यांना बहर घेता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
निलंगा तालुका हा लाल मिरची व इतर भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. कर्नाटक राज्यातील शेतकरीदेखील या परिसरातील काही गावांमध्ये करार शेतीच्या माध्यमातून मिरची लागवड करतात.
निलंगा तालुक्यातील नणंद गावच्या श्री. बाबुराव देशमुख यांनी मिरचीच्या जोडीला सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे. सन २०२१ मध्ये ४०० झाडांची लागवड करण्यात आली. त्यातील ४९० झाडे जगली. या झाडांना २०२३ मध्ये चांगली फळधारणा झाली.

हरिमन-९९, अण्णा, डोरसेट-बोल्डर या दर्जेदार व अधिक उत्पादनक्षम जातीच्या उष्ण तापमानात येणाऱ्या Apple सफरचंदाची शिफारस महाराष्ट्राकरिता करण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये छाटणी, त्यानंतर पाणी आणि खत (एन.पी.के.) दिल्यानंतर फेब्रुवारीत बाग फुलावर येते. सरासरी १०० ते २०० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे खत देण्यावर भर राहतो. याशिवाय शेणखत व कंपोष्ट खतावर श्री. देशमुख यांनी भर दिली. यामुळे सफरचंद बागेची वाढ जोमदार झाली.
मे आणि जून २०२३ च्या दरम्यान फळ परिपक्व होतात. बागेला पाणी ठिबक सिंचन (ड्रीप) ने दिले जाते. यंदा (२०२३-२४) बागेतून सफरचंद फळांची व्यावसायिक उत्पादकता शक्य झाली असती परंतु आजारपणामुळे शास्त्रोक्त छाटणी करता आली नाही. तरीदेखील Apple Farming सफरचंद फळबागेवर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही.
शास्त्रोक्त छाटणीवर भर
Apple Farming सफरचंद बागेतील छाटणी ही शास्त्रोक्त पद्धतीने करावी लागते. त्यामुळे ती आपल्या नजरेसमोरच झाली पाहिजे. त्याकरिता कौशल्यपूर्ण मजूर असावा. तो उपलब्ध नसेल तर नुकसान होण्याची भीती दाट असते.
बिलासपूर व हिमाचल प्रदेश या प्रांतातील तज्ज्ञांकडून सफरचंद पिकाच्या व्यवस्थापनाचे बारकावे व त्याबाबत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतरच या भागात हे पीक घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. या त्यांच्या प्रयोगशील Apple Farming सफरचंद शेतीचा आदर्श घेत गावचे कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
What i do not realize is in fact how you are no longer actually much more wellfavored than you might be right now Youre very intelligent You recognize thus considerably in relation to this topic made me in my view believe it from numerous numerous angles Its like men and women are not fascinated until it is one thing to do with Lady gaga Your own stuffs excellent All the time handle it up
I just could not leave your web site before suggesting that I really enjoyed the standard information a person supply to your visitors Is gonna be again steadily in order to check up on new posts
Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problem
I loved as much as youll receive carried out right here The sketch is attractive your authored material stylish nonetheless you command get bought an nervousness over that you wish be delivering the following unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this hike
Wow superb blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is magnificent as well as the content
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/register?ref=P9L9FQKY